राज्यातील सरकार पाच वर्षे पूर्ण करेल!

899

जोपर्यंत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आणि काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी ठरवतील तोपर्यंत महाराष्ट्रातील सरकारला कोणताही धोका नाही. हे सरकार पाच वर्षे पूर्ण करेल यात शंका नाही अशी स्पष्टोक्ती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केली.

राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री आर.आर. पाटील यांच्या पाचव्या स्मृती दिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी अजित पवार आज त्यांच्या अंजनी या गावी आले होते. त्यावेळी प्रसारमाध्यमांनी त्यांना बोलते केले. राज्याचे माजी मंत्री आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार हे वारंवार हे सरकार लवकरच कोसळेल असे वक्तव्य करत आहेत. याबाबत पत्रकारांनी विचारले असता अजित पवार बोलत होते. ते म्हणाले, हे सरकार तीन पक्षांचे असले तरी सर्व विचारांनी एकत्र आहे आणि सरकार ठेवायचे की नाही याचा निर्णय राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेनेचे हे तीन नेतेच घेऊ शकतात. त्यामुळे भाजपच्या या नेत्यांनी चिंता करू नये.

आपली प्रतिक्रिया द्या