घाट दुर्घटनेतील दोषींवर कडक कारवाई करणार – उपमुख्यमंत्री अजित पवार

पंढरपूरच्या विकासकामांसाठी राज्य शासनाने आजवर शंभर कोटींपेक्षा अधिकचा निधी दिला आहे, मात्र या शहराचा बकालपणा काही कमी झालेला दिसत नाही. याचा अर्थ विकास कामांसाठी आलेल्या निधीचा विनियोग व्यवस्थित झालेला नाही असे दिसते. कामांचा दर्जा चांगला असता तर घाट कोसळला नसता अशी खंत व्यक्त करीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घाट दुर्घटना आणि विकासकामांची पुढच्या आठवड्यात आढावा बैठक घेऊ या चौकशीत जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर 302 प्रमाणे गुन्हा दाखल करु असे आश्वासन दिले.

उपमुख्यमंत्री पवार यांनी घाट दुर्घटना स्थळी भेट देऊन पाहणी केली आणि मृत कुटुंबाची भेट घेऊन तुमचे सांत्वन केले.

आपली प्रतिक्रिया द्या