
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी अस्मिता, महाराष्ट्राचा स्वाभिमान ज्वलंत ठेवला. मराठी माणसाला ताठ मानेने जगण्याची चेतना दिली. अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी धमन्यांमध्ये बळ दिले. ‘गर्व से कहो हम हिंदू है’ अशी घोषणा देत अखंड हिंदुस्थानातील हिंदू जागा केला. देव, देश आणि धर्मासाठी झोकून देणारी पिढी निर्माण केली. आजही त्यांचे विचार नव्या पिढीसाठी प्रेरणादायी ठरतात. 17 नोव्हेंबर या शिवसेनाप्रमुखांच्या महानिर्वाण दिनी त्यांना विविध स्तरांतून मानवंदना देण्यात येत आहे.
शिवसेनाप्रमुख, हिंदुहृदयसम्राट, आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांची आज पुण्यतिथी. मराठी भाषा, मराठी माणूस, मराठी संस्कृती, मराठी अस्मिता, महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी जीवनभर लढलेल्या, हिंदुत्वाचा नेमका अर्थ समाजाला सांगणाऱ्या स्वर्गीय बाळासाहेबांना विनम्र अभिवादन! pic.twitter.com/77HmBPkoen
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) November 17, 2022
दरम्यान, विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनी ट्वीटद्वारे त्यांना आदरांजली वाहिली आहे. अजित पवार यांनी ‘शिवसेनाप्रमुख, हिंदुहृदयसम्राट, आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांची आज पुण्यतिथी. मराठी भाषा, मराठी माणूस, मराठी संस्कृती, मराठी अस्मिता, महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी जीवनभर लढलेल्या, हिंदुत्वाचा नेमका अर्थ समाजाला सांगणाऱ्या स्वर्गीय बाळासाहेबांना विनम्र अभिवादन. महाराष्ट्राच्या हितासाठी शिवसेनेचा विचार आणि संघटना टिकली पाहिजे, हीच बाळासाहेबांना खरी आदरांजली ठरेल,’ अशा शब्दांमध्ये त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

























































