
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला बारामतीत अपघात झाला आहे. लँडिंग दरम्यान विमान क्रॅश झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. सकाळी 8.45 ते 9 वाजताच्या दरम्यान हा अपघात झाला असून या विमानामध्ये अजित पवारांसह आणखी काही जण असल्याचे कळते.
महानगरपालिका निवडणुकानंतर राज्यात जिल्हा परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. याच निमित्ताने अजित पवार यांची बुधवारी बारामती येथे सभा होणार होती. या सभेसाठी अजित पवार आणि इतर विमानाने बारामतीत दाखल होत होते. विमान लँड होत असतानाच भीषण अपघात झाला. हा अपघात झाला तेव्हा विमानात अजित पवार, त्यांचे सुरक्षारक्षक आणि वैमानिक होते. या अपघातात अजित पवार गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.

विमान कोसळल्याची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाने पाण्याचा मारा करत घटनास्थळी लागलेली आग आटोक्यात आणली. त्यानंतर अपघातात गंभीर जखमी झालेल्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केले.
View this post on Instagram



























































