Ajit Pawar Plane Crash – रोहित पवारांनी दिल्लीत सोनिया गांधी यांची भेट घेतली, नेमकी काय झाली चर्चा?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघातावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी वारंवार संशय व्यक्त केला आहे. रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेत अपघात की घातपात असा सवाल उपस्थित करत व्हीएसआर कंपनीचे मालक व्ही.के. सिंह यांच्यावरही गंभीर आरोप केले. याच पार्श्वभूमीवर त्यांच्या दिल्लीत प्रमुख विरोधी पक्षांच्या नेत्यांशी भेटीगाठीही सुरू असून मंगळवारी त्यांनी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि राज्यसभा सदस्य सोनिया गांधी यांची भेट घेतली.

रोहित पवार हे सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांनी प्रमुख विरोधी पक्षांच्या नेत्यांची भेट घेत अजित पवार यांच्या अपघाताचा मुद्दा संसदेत उपस्थित करण्याची मागणी केली. याआधी त्यांनी आम आदमी पार्टीचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, खासदार संजय सिंह यांचीही भेट घेतली होती. आता त्यांनी संसदेच्या आवारामध्ये काँग्रेस खासदार सोनिया गांधी यांची भेट घेत अजित पवार अपघात प्रकरणावर चर्चा केली.

डीजीसीएच्या त्रुटी आणि नागरी उड्डाण मंत्रालयाच्या कामकाज संदर्भात दोघांमध्ये चर्चा झाल्याची प्राथमिक माहिती मिळतेय. यावेळी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेही उपस्थित होते.

मल्लिकार्जुन खरगे यांची भेट

दरम्यान, याआधी सोमवारी रोहित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचीही भेट घेतली होती. महाराष्ट्राशी अगदी जवळचा संबध असलेले काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लीकार्जुन खर्गे साहेब यांचीही दिल्लीत भेट घेऊन अजितदादांच्या विमान अपघातासंदर्भात त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली आणि अजितदादांच्या अपघाताबाबत आम्ही जमा केलेल्या सर्व माहितीचं प्रेझेंटेशनही त्यांना देऊन या विषयाच्या निष्पक्ष चौकशीसाठी संसदेत आवाज उठवण्याची विनंती केली, असे रोहित पवार यांनी एक्स पोस्ट करत सांगितले.

दादांना न्याय मिळवून द्या! रोहित पवार यांनी घेतली उद्धव ठाकरे यांची भेट

मल्लिकार्जुन खरगे हे ज्येष्ठ नेते असून त्यांना अनेक बाबींची कल्पना आहे. त्यामुळे या अपघाताबाबतचे बारकावे, शंका आणि तपासाबाबतची माहिती त्यांनी जाणून घेतली. मला विश्वास आहे की ते राज्यसभेत हा विषय उपस्थित करतील आणि अजितदादांना न्याय मिळवून देण्याकामी मदत करतील, अशी आशा रोहित पवार यांनी व्यक्त केली.

अजितदादांचे विमान पडले की पाडले गेले? बड्या नेत्यांकडून व्ही. के. सिंग यांना संरक्षण, रोहित पवार यांचा दावा