अजित पवारांनी केला चुकीचा शब्दप्रयोग, आता व्यक्त केली दिलगिरी

एका प्रचारसभेत बलोताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चुकीचा शब्दप्रयोग केला होता. त्यावर अजित पवार यांनी दिलगिरी व्यक्त केली. असा शब्द वापरायला नाही पाहिजे होता असे अजित पवार म्हणाले.

एका प्रचारसभेत बोलताना अजित पवार म्हणाले होते की आपल्याला शहरांचा विकास करायचा आहे. काही नेते येतात आणि भाषण करतात की आम्ही शहरांचा विकास करू. पण विकास करत नाहीत, शहरं बकाल होतात, भिकार** आहेत असे अजित पवार म्हणाले होते.

आज एका ठिकाणी बोलताना अजित पवार म्हणाले की तो शब्द मी वापरायला नाही पाहिजे होता, त्या बद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. शहर कुठलेही असो त्यात बकालपणा असता कामा नये असेही अजित पवार म्हणाले.