मुलाने गजा मारणेची भेट घेणं अजित पवारांना आवडले नाही

कुख्यात गुंड गजानन उर्फ गज्या मारणे याच्या घरी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांनी गुरुवारी भेट दिली होती. याबाबत पार्थ यांचे वडील अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केली आहे. पार्थ पवार आणि गज्या मारणे भेटीने राजकीय वर्तुळात पार्थ पवार खळबळ उडाली आहे. लोकसभा भेटीने निवडणुकांच्या वर्तुळात पार्श्वभूमीवर दोघांची भेट चर्चेचा विषय ठरली आहे. दरम्यान, मारणेविरुद्ध खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी, अपहरण, दहशत माजविणे असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे आता राजकीय भेटीने कलगीतुरा रंगणार असल्याचे बोलले जात आहे.

अजित पवार हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री असून त्यांच्या मुलाने गुंडाची जाहीरपणे भेट घेतल्याने सर्वसामान्य नागरिकांच्या भुवया आश्चर्याने उंचावल्या आहेत. अजित पवार यांनी सदर प्रकरणी सारवासारव करताना आपल्याला मुलाची ही कृती अजिबात पटली नसल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले की, “ही अतिशय चुकीची गोष्ट घडलेली आहे. मी त्याबद्दल माहिती घेत आहे. बरोबरच्या कार्यकर्त्यांनी पार्थ यांना तिथे नेले होते. यावेळी ती व्यक्ती(गज्या मारण) घरातच होती. मात्र असं अजिबात घडता कामा नये. मागे मी एका गुंडाला पक्षात प्रवेश दिला होता, याबाबत मला कळालं असता त्याच संध्याकाळी त्याला पक्षातून काढून टाकण्यात आले. मी पोलिसांना कटाक्षाने सांगत असतो की अशा प्रवृत्तीची माणसे आमच्या आजूबाजूला असतील तर त्यांना जवळ येऊ देऊ नका.

आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पार्थ पवार यांनी मारणेची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. मारणे टोळीची कोथरूडसह शहरात दहशत आहे. मारणेची पत्नी जयश्री मनसेच्या नगरसेविका होत्या. मारणेने पार्थ पवार यांची भेट घेतल्याचे छायाचित्र सोशल मीडियावर प्रसारित झाल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.यावेळी मारणे आणि त्याची पत्नी जयश्री उपस्थित होते. दीपक मानकर, माजी नगरसेवक दत्ता धनकवडे, प्रदीप देशमुख उपस्थित होते.