अजित पवारांनंतर अशोक चव्हाणांचीही ‘लघुशंका’; संघर्ष यात्रेत जीभ घसरली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, मालेगाव

चार वर्षांपूर्वी तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही ‘पाऊस पडला नाही तर मग मी काय धरणात xx’ अशी दुष्काळग्रस्तांची खिल्ली उडवली होती. आज माजी मुख्यमंत्री आणि काँग्रस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचीही संघर्ष यात्रेत जीभ घसरली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना चव्हाण म्हणाले, एका गाकातील शाळेत दुपारची सुट्टी झाली असताना मुले जेवत होती. याकेळी एक विद्यार्थी मास्तरांच्या टेबलवर उभा राहून लघवी करत असल्याचे मास्तरांनी पाहिले. मास्तरांनी हा सर्व प्रकार त्या विद्यार्थ्याच्या वडिलांना सांगण्याचे ठरवले आणि ते थेट त्या मुलाच्या घरी गेले. त्यावेळी त्या मुलाचे वडीलही घराच्या छतावर उभे राहून लघवी करत होते. अशीच परिस्थिती आज राज्यात आणि देशात झाली आहे… ‘बाप तैसा बेटा.’

summary-ajit pawar spoke improper words in sangharsh yatra