अजित पवारांचा गट पुन्हा वायबी सेंटरवर; शरद पवारांनी विचारला एकच प्रश्न

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अजित पवार गट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचं मन वळवण्याचा प्रयत्न करत असून दोन दिवसात या गटानं त्यांची दोन वेळा भेट घेतली आहे. आज अधिवेशन सुरू झाल्यानंतरही ते वायबी सेंटरवर दाखल झाले. त्यांनी शरद पवारांची पुन्हा भेट घेतली आणि आपणच आमचे नेते आहात, पक्षात फुट नको म्हणून समर्थन द्या अशी गळ घातल्याचं वृत्त आहे. मात्र त्यावेळी पवार काही बोलले नाहीत. मात्र त्यांनी सर्व आमदारांना एक प्रश्न केला.

शरद पवार यांनी तिथे उपस्थित असलेल्या आमदारांना आपापल्या भागात पेरण्या झाल्या का असा प्रश्न केला.

अजित पवार यांच्या नेतृत्वात प्रफुल्ल पटेल आणि सोबतचे आमदार वायबी सेंटरवर दाखल झाले. यावेळी त्यांनी शरद पवार यांची भेट घेतली. आमदारांनी शरद पवार यांना पक्षात फुट पडू देऊ नये, अशी विनंती केली. तर शरद पवार यांनी उपस्थित आमदारांना आपआपल्या भागात पेरण्या झाल्या का, याबाबत विचारणा केल्याचं वृत्त आहे. मात्र अजित पवार गटाच्या समर्थनात त्यांनी एक शब्दही उच्चारला नाही. त्यामुळे अजित पवार गट अस्वस्थ असल्याचं बोललं जात आहे.