भाजपचा पराभव दिसू लागल्यामुळे मोदी खचले आहेत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव समोर दिसू लागल्यामुळे खचलेल्या मोदींनी आत्मविश्वास गमावला आहे आणि त्यांच्या भाषणांमध्येही डळमळीतपणा दिसू लागला आहे, असे जोरदार टीकास्त्र समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी रविवारी येथे सोडले.

जर इंडिया आघाडीने पेंद्रात सरकार बनवले तर ते राम मंदिरावर ‘बाबरी लॉक’ लावतील, असे मोदींचे बोलणे त्यांची हीच गडबड दाखवते. त्यांचे हे म्हणणे म्हणजे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा ‘अनादर’ आहे, असा टोलाही अखिलेश यांनी लगावला. सर्वोच्च न्यायालयाने स्वतःहून याची दखल घ्यावी. या प्रकरणाची माहिती घेऊन कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.

4 जूननंतर ज्या दिवशी मतमोजणी होईल, त्या दिवशी इंडिया आघाडीच सरकार स्थापन करेल, असे ठामपणे सांगून यादव यांनी दावा केला की, पेंद्रीय मंत्रिमंडळासोबतच मीडियामधील वार्तांकनही बदलेल. सरकार स्थापन केल्यावर इंडिया आघाडी अग्निवीर योजना रद्द करेल, असे आश्वासनही त्यांनी दिले.