अकोल्यात आणखी पाच जणांचे धर्मांतर, चार जणांना अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अकोल्यात आणखी पाच जणांचे जबरदस्तीने मुस्लीम धर्मात धर्मांतर करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या पाच जणांमधील चार जण हे एकाच कुटुंबातील असल्याचे समजते.

अकोल्यातील चन्नी पोलिसांनी बुधवारी या प्रकरणी अल्ताफ गाडीवाले, अन्सार गाडीवाले, शेख तन्वीर, शेख अझीम मंझूर या चार जणांना अटक केली. या चौघांनी शुभम नावाच्या तरुणाला जबरदस्तीने मुस्लीम धर्म स्वीकारायला भाग पाडले. तसेच त्यानंतर शुभमने त्याचे नाव बदलून मोहम्मद अली ठेवले होते. या प्रकरणी मुलाच्या कुटुंबीयांनी पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर या चौघांना अटक करण्यात आली. या चौघांनीही त्याच्या कुटुंबियांना धर्मांतर केले नाही तर गावातून बाहेर काढण्यात येणार असल्याची धमकी दिली होती.