
अकोला जिल्ह्यात सोमवारी सकाळी प्राप्त 81 चाचणी अहवालामध्ये कोरोनाचे आणखी 9 रुग्ण पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले. असून आता जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णसंख्या 64 वर पोहोचली आहे.
जिल्हा माहिती कार्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार रविवारच्या सकाळच्या अहवालात एकुण 81 अहवाल प्राप्त झाले. यामध्ये 9 जण पॉझिटिव्ह निष्पन्न झाले. या पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये 5 जण कृषीनगर, 3 जण कोठडी बाजार, लाल बंगला, बैदपुरा येथील प्रत्येकी 1 तर अंत्री बाळापूर येथील एका रुग्णाचा समावेश आहे.
अकोल्यात रविवारी तब्बल 15 रुग्ण आढळून आले होते. आता त्यात आजच्या आठ जणांची भर पडली आहे. दरम्यान कोरोना व्हायरस गत आठवड्यात विश्रांती घेतल्याचे चित्र होते. परंतू शुक्रवारपासून या विषाणूने प्रतिबंधीत क्षेत्रासह बाहेरच्या परिसरात शिरकाव करुन तीन दिवसात 28 जणांवर झडप घातली आहे. जिल्ह्यात आता कोरोना बाधितांची संख्या 64 वर पोहोचली आहे. यामध्ये 7 मयत तर 13 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.

























































