बंद घराचे कुलूप तोडून 55 हजारांचा ऐवज लंपास

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अकोला येथील सुधाकर रामदास शहाणे यांच्या बंद घराचे कुलुप तोडुन दागीने, मोबाईल व रोख रक्कम असा एकुण ५५ हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरून नेल्याची घटना घडली आहे. अकोला गावातीलच इतर सहा ते सात ठिकाणी चोरी व चोरी करण्याचा प्रयत्न झाल्याने परिसरात अवस्थता निर्माण झाली आहे. याबाबत सुधाकर शहाणे यांच्या फिर्यादीवरून पाथर्डी पोलिस ठाण्यात आज्ञात चोरटया विरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिस सूत्रांकडून कडून मिळालेली माहिती अशी की, सुधाकर रामदास शहाणे हे पत्नी चंदा सुधाकर शहाणे यांच्यासह अकोला येथील रहिवासी आहे. बुधवारी ते दोघे पती पत्नी नातेवाईकाच्या कार्यक्रमानिमित्त राहुरी येथे मुक्कामी गेले होते. त्यामुळे घर बंद होते. गुरुवारी सकाळी आपला मुलगा व सुन राहुरी येथे गेले असताना घर उघडे कसे असे शेजारीच रहात असलेल्या व पहाटे व्यायामासाठी घराबाहेर पडलेल्या सुधाकर शहाणे यांच्या आईच्या निर्दशनास आले. याबाबत त्यांनी मोबाईल वरून शहाणे यांना याबाबत माहिती दिली. सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास पती पत्नी घरी आल्यावर पाहिले असता चोरटयांनी बंद घराचे कुलुप तोडुन घरात प्रवेश केला व घरातील कपाटाचा कोयंडा तोडुन कपाटातील 20 हजार रुपये रोख रक्कम, तीस ग्रॅम वजनाचे 30 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने व 5 हजार रुपये किंमतीचा मोबाईल चोरून नेला. याबाबत पोलिसात तक्रार करण्यात आली असून पोलीस चोरांचा शोध घेत आहेत.