
मराठमोळा दिग्दर्शक अक्षय इंडीकरचा ‘स्थलपुराण’ हा चित्रपट यंदाच्या ब्राझील चित्रपट महोत्सवात झळकणार आहे. महत्वाचे म्हणजे या महोत्सवात झळकणारा हा पहिला मराठी चित्रपट असणार आहे. नुकतीच अक्षयने आपल्या सोशल मीडियावरून याबाबत माहिती दिली आहे. आपला आनंद व्यक्त करताना अक्षय म्हणाला, ‘माझा दुसरा सिनेमा स्थलपुराण ‘ओल्हार दी सिनेमा-क्युरितिबा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल’मध्ये दाखवण्यासाठी निवडला गेला आहे. मराठीतील बहुदा हा पहिला चित्रपट असेल. यानिमित्ताने मी सगळ्या टीमचे अभिनंदन आणि आभार. ब्राझीलमध्ये तसेच पूर्ण साऊथ अमेरिका खंडात मोजक्या 600 लोकांना आमचा सिनेमा बघता येणार आहे आणि मला ब्राझीलीयन प्रेक्षकांसोबत ऑनलाईन संवाद साधता येणार आहे.’

























































