अक्षय कुमार लढवणार लोकसभा निवडणूक? वाचा काय म्हणाला अक्षय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता अक्षय कुमार हा भाजपच्या तिकीटावर लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची चर्चा रंगली होती. अक्षय अमृतसर मधून निवडणूक लढवणार असल्याचेही बोलले जात होते. मात्र अक्षयने या सर्व अफवा असून तो निवडणूक लढवणार नसल्याचे सांगितले आहे.

अक्षय कुमार हा अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये भाग घेत असतो, सरकारच्या योजना लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी जनजागृतीतही तो पुढाकार घेतो. त्यामुळे अक्षय भाजपकडून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा रंगली होती. मात्र नुकतेच एका मुलाखतीत अक्षयने राजकारण हा माझा अजेंडा नाही. मला जे करायचंय ते मी चित्रपटांच्या माध्यमातून करतो. मी ते राजकारणाच्या माध्यमातून कधीच करू शकत नाही, असे अक्षय कुमारने सांगितले आहे.