अक्षय कुमारला हेलिकॉप्टरची परवानगी कशी? भुजबळ म्हणतात, दौऱयाबाबत संदिग्धता नाही

1083

कोरोना लॉकडाऊनच्या काळात बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार याने केलेला नाशिक दौरा वादात सापडला आहे. लॉकडाऊनमधील निर्बंधामुळे मुख्यमंत्री, मंत्र्यानाही हेलिकॉप्टरची परवानगी नसताना अक्षय कुमारला हेलिकॉप्टरची परवानगी कशी दिली? अशी विचारणा केली जात आहे. दरम्यान नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी या दौऱयाबाबत कुठलीही संदिग्धता राहिलेली नसल्याचे स्पष्ट केले आहे.

अक्षय कुमारच्या हेलिकॉप्टरला उतरण्यास परवानगी, रिसॉर्टमधील वास्तव्य याबाबत प्रशासनाकडून माहिती घेतली. त्यानुसार अक्षय कुमार वैद्यकीय उपचारासाठी नाशिकमध्ये आला होता. कोरोनातील कार्याबद्दल नाशिकचे पोलीस आयुक्त त्यांना शुभेच्छा देण्यासाठी गेले होते, त्यांच्यासोबत शहर पोलिसांचा ताफा गेला होता. नाशिक पोलिसांकडून अक्षय कुमारला कुठलीही सुरक्षा व्यवस्था पुरविण्यात आली नव्हती, त्यामुळे या प्रकरणाबाबत गैरसमज नको, असे भुजबळ यांनी म्हटले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या