अक्षयचा ‘ओएमजी 2’ लवकरच

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शरीरावर भस्म, लांब जटा, हातात डमरू…अभिनेता अक्षय कुमारच्या नव्या लुकने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. ‘ओएमजी 2’ या चित्रपटाचे हे पोस्टर असून यातून अक्षयचा फर्स्ट लुक समोर आला आहे.

अक्षय कुमारने आज ‘ओएमजी 2’ चे पोस्टर शेअर केले. तसेच चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली. त्यानुसार ‘ओएमजी 2’ चित्रपट 11 ऑगस्ट रोजी सिनेमागृहांत प्रदर्शित होणार आहे. याच दिवशी सनी देओलच्या ‘गदर’चा दुसरा भाग प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे बॉक्स ऑफिसवर ‘ओएमजी 2’ विरुद्ध ‘गदर’ अशी टक्कर पाहावयास मिळणार आहे. ‘ओएमजी 2’ चे पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ‘रक्षाबंधन’, ‘रामसेतू’ आणि ‘सेल्फी’ या फ्लॉप चित्रपटानंतर अक्षयचा ‘ओएमजी 2’ प्रदर्शित होणार आहे.