अक्षय कुमारने तोडला सलमान खानचा ‘हा’ विक्रम

715

सध्या चित्रपट जगतात अक्षय कुमार नावाचं नाणं खणखणीत वाजताना दिसत आहे. सातत्याने हिट चित्रपट देऊन बॉक्स ऑफिसवरचाही खिलाडी ठरलेल्या अक्षयचे चार चित्रपट पुढील वर्षी येऊ घातले आहेत. यंदा त्याच्या मिशन मंगल या चित्रपटाने 200 कोटींचा टप्पा पार केला आहे. या आकड्यामुळे त्याने सलमान खानचा एक विक्रम मोडला आहे.

मिशन मंगलने 200 कोटींचा आकडा पार करताना प्रथमच अक्षय कुमारला 200 कोटींच्या घरात नेऊन ठेवलं आहे. मिशन मंगलने 3 दिवसात 50 कोटी, 5 दिवसांत 100 कोटी तर 11 दिवसांत 150 कोटींचा टप्पा पार केला. 29 दिवसांमध्ये 200 कोटींच्या घरात जाणारा मिशन मंगल अक्षयचा आजवरचा सगळ्यात हिट चित्रपट ठरला आहे.

मिशन मंगल हा 15 ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाला होता. यापूर्वी स्वातंत्र्य दिनी प्रदर्शित होऊन सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांमध्ये सलमानचा एक था टायगर या चित्रपटाचा समावेश होता. सलमान आणि कतरिना अभिनित हा चित्रपट 198.78 कोटी इतकी कमाई करत या यादीत सर्वप्रथम क्रमांकावर होता. पण, सलमानला मागे टाकत अक्षयने आता नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या