आळंदीत संचारबंदी कडक निर्बंध, अंमलबजावणीस पोलीस यंत्रणा तैनात

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधत कोरोनाचा उद्रेक दिवसेंदिवस वाढत असल्याने कोरोनाची ही साखळी तोडण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी कडक निर्बंध जाहीर केले त्याप्रमाणे आळंदीसह पंचक्रोशीत कडक र्निबंध आळंदी पोलीसांनी कार्यवाहीत आणुन आळंदी ला जोडणा-या सर्व रस्त्यावर पोलीस तैनात करण्यात आले आहेत.

आळंदीतील विविध चौकात पोलीसांची खडी फौज बंदोबस्तावर ठेवण्यात आली आहे. लावण्यात आलेल्यि बंदोबस्ताची पाहणी आळंदी पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांनी पाहणी करीत बंदोबस्तावरील पोलीस कर्मचारी यांना सुचना केल्या. संचारबंदीचे र्निबंधाची कडक अंमंलबजावणी करण्याचे सुचना देत नागरीकांनी संचारबंदीचे आदेशाचे व शासनाने केलेल्या सुचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.

अनावश्यक कारणा शिवाय बाहेर फिरु नये असे आवाहन आळंदी नगरपरिषद मुख्याधिकारी अंकुश जाधव यांनी केले आहे. आरोग्य सेवा आळंदी परीसरात सक्षम असुन 45 वयावरील लाभार्थी नागरीकांनी लसीकरण करून घेण्याचे आवाहन आळंदी ग्रामिण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. जी.जी.जाधव यांनी केले आहे.

आळंदी व पंचक्रोशीत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. यात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरू राहणार आहे, मात्र त्या केवळ अत्यावश्यक कर्मचाऱ्यां साठी सूरू राहणार आहे. सार्वजनिक वाहतूक सुरू राहील. मात्र कारण नसताना घराबाहेर पडल्यास कारवाई होणार आहे.

कडक निर्बंध असुन यात लॉकडाऊन निर्बंध अधिक प्रभावी अंमलबजावणी कोरोनाची ब्रेक द चनसाठी राज्यात संचारबंदी आहे. या पुढील 15 दिवस संचारबंदीत येणे जाणे बंद रहाणार आहे. आवश्यक काम नसेल तर घराबाहेर पडायचे नाही. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापने बंदचे आदेश आहेत.

सार्वजनिक वाहतुक म्हणजे लोकल, बस व्यवस्था सुरू राहणार असुन त्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्‍यांसाठी वापरले जाणार आहेत. वैद्यकीय सेवा, लस उत्पादक, वैद्यकीय वाहतुक, वैद्यकीय साहित्य वाहतूक सुरू राहणार आहे. शीतगृह, जनावरांचे दवाखाने, शेतीची कामे सुरू राहतील. बँका, आर्थिक संस्था, अधिस्वीकृती धारक पत्रकार सुरू राहणार तसेच बांधकाम साईट सुरू राहणार असुन तिथे काम करणारे कर्मचार्‍यांची तिथेच राहण्याची व्यवस्था करण्याची अट आहे.

हॉटेल्स, रेस्टॉरंट बंद, मात्र होम डिलिव्हरी सुरू राहील

रस्त्यावरील खाद्यपदार्थ सेवा सुरू राहणार आहे. कडक अटीशर्ती या संचारबंदीचे काळात असून कोरोनाचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी नागरीकांनी घरी रहाण्याचे आवाहन मुख्याधिकारी अंकुश जाधव यांनी केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या