मद्यपान करणाऱ्यांनो सावधान! कॅन्सरवरील एक चिंताजनक अहवाल आला समोर

मद्यपान करणाऱ्यांसाठी एक चिंताजनक बातमी समोर येत आहे. मद्यपानाचा थेट कर्करोगाशी संबंध असल्याचे एका अभ्यासातून समोर आले आहे. या अभ्यासानुसार, वर्ष 2020 मध्ये मद्यपानाच्या सेवनामुळे कर्करोगाचे साडे सात लाखांहून अधिक नवीन प्रकरण नोंदवण्यात आली आहेत. या काळात अमेरिकन लोक अधिक मद्य सेवन करत असल्याचे समोर आले आहे.

13 जुलै रोजी लॅन्सेट या मेडिकल जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या या अभ्यासानुसार, वर्ष 2020 मध्ये मद्यपानामुळे 4 टक्के कर्करोगाची प्रकरणे वाढली आहेत. मद्य सेवनाशी संबंधित कर्करोगाची बहुतांश प्रकरणे अशा लोकांमध्ये दिसून आली आहेत, ज्यांनी एका दिवसात दोनपेक्षा अधिक ड्रिंक्स घेतल्या.

नॉर्थ-वेस्टर्न मेडिसिनमधील थोरॅसिक सर्जन डॉ. डेव्हिड ओडेल यांच्या मते, अल्कोहोल एक उत्तेजक पदार्थ आहे. हे आपल्या तोंड, घसा, पोटाच्या आवरणासाठी समस्या निर्माण करते. आपले शरीर आपल्या जखमा भरून काढण्याचा प्रयत्न करतो. मात्र कधीकधी आपले शरीर असामान्य पद्धतीने जखमा भरायचे काम करतो, ज्यामुळे कर्करोग होण्याची सुरुवात होऊ शकते.

मद्याशी संबंधित कर्करोग होण्याची 75 टक्के प्रकरणे एकट्या पुरुषांमध्ये असल्याचे समोर आले आहे. बहुतांश प्रकरणांमध्ये मद्यपानामुळे होणाऱ्या कर्करोगाचा संबंध यकृतासह घशातून पोटाकडे जाणाऱ्या नलिकेशी दिसून आला आहे. तर स्त्रियांमध्ये स्तनाचा कर्करोग सर्वात सामान्य आहे. हा नवीन अभ्यास अशा वेळी समोर आला आहे जेव्हा कोरोना या साथीच्या काळात मद्याच्या सेवनात लक्षणीयवाढ झाली आहे.

गेल्या वर्षीही एका सर्वेक्षणात दोन तृतीयांश अमेरिकन लोकांनी कबूल केले होते की, कोरोना काळादरम्यान त्यांचे मद्यपानाचे सेवन अधिक वाढले होते. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, आनुवंशिकरित्या कर्करोग होण्याचा धोका केवळ 5-10 टक्के इतका असतो. अनुवांशिक व्यतिरिक्त, धूम्रपान, अल्कोहोल, लठ्ठपणा आणि खाण्याच्या सवयी ही कर्करोगाची सर्वात मोठी कारणे आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या