आलिया भटने केलं अवॉर्ड फिक्सिंग? व्हिडीओ व्हायरल

1034

आलिया भट सध्या तिच्या आगामी ब्रह्मास्त्र या चित्रपटात व्यग्र आहे. तिच्याकडे सडक आणि गंगुबाई काठियावाडी असे दोन चित्रपटही आहेत. पण, सध्या एका वेगळ्याच कारणाने तिचं नाव चर्चेत आलं आहे. एका व्हायरल झालेल्या व्हिडीओनुसार, आलियाने अवॉर्ड फिक्सिंग केल्याचा संशय नेटकऱ्यांना आहे. या व्हिडीओवरून कंगना रणौतची बहीण रंगोली चंडेल हिने आलियावर निशाणाही साधला आहे.

या व्हिडीओत आलिया एका स्टुडिओच्या मागच्या दारातून बाहेर येताना दिसते. ती वेळ सकाळची आहे. तिच्या हातात एक ट्रॉफीही दिसत आहे. त्यावेळी तिथे उपस्थित फोटोग्राफर्स तिचे फोटो काढतात. तेव्हा आलियाचे मॅनेजर त्यांना सायंकाळी सातनंतर हे फोटो पोस्ट करण्याची विनंती करताना या व्हिडीओत दिसत आहे. साधारणतः सन्मान सोहळे सायंकाळी असतात. पण, आलियाच्या व्हिडीओत लख्ख उजेड दिसत आहे. त्यामुळे त्यामुळे हे अवॉर्ड फिक्सिंग असल्याचा संशय नेटकऱ्यांना येत आहे.

या व्हिडीओवर रंगोली चंडेल हिनेही टीकास्त्र सोडलं आहे. ती म्हणाली की, चला इतका तर खरेपणा आहे की तू हे काम शांतपणे करत आहेस, कोणाच्याही समोर न येता. चला बरं वाटलं, काहीतरी आहे तुझ्यात जे तुला हे काम करण्यापासून थांबवत आहे, असं ट्वीट रंगोलीने केलं आहे.

पाहा व्हिडीओ-

आपली प्रतिक्रिया द्या