आलिया भट ट्विटरवर मोस्ट एंगेजिंग अभिनेत्री

सामना ऑनलाईन, मुंबई

सध्या आलिया भट तरुणाईच्या गळ्यातला ताईत बनली आहे. आलियाने आपल्या अभिनय नैपुण्याने आणि ट्रेंडी लुक्सने सोशल नेटिवार्ंकग साइट्सवर लोकांचे आपल्याकडे लक्ष वेधून घेतले आहे. त्यामुळे तर ट्विटरवर ती सध्या ‘मोस्ट एंगेजिंग अॅक्ट्रेस ऑफ बॉलीवूड’ बनली आहे. स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या अनुसार आलिया भट १०० गुणांसह ‘मोस्ट एंगेजिंग अॅक्ट्रेस ऑन’ ट्विटर’ झाली आहे. अमेरिकेच्या स्कोर ट्रेंड्स इंडिया या मीडिया-टेक वंâपनीने लोकप्रियतेच्या निकषांवर आधारित ही लिस्ट दिलेली आहे. स्कोर ट्रेंड्सने दिलेल्या माहितीनुसार आलिया पहिल्या स्थानी आहे तर ८९ गुणांसह सौंदर्यवती अनुष्का शर्मा ट्विटरवर दुसऱ्या स्थानी आहे. दीपिका पादुकोण ७६ गुणांसह तिसऱ्या स्थानी आहे. श्रीलंकन ब्युटी आणि रेस-३ गर्ल जॅकलिन फर्नांडीस चौथ्या स्थानी तर आंतरराष्ट्रीय आयकॉन प्रियांका चोप्रा ६३ गुणांसह पाचव्या स्थानावर आहे.