आलिया भटने ड्रायव्हर व मदतनीसाला दिला 50 लाखांचा चेक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

अभिनेत्री आलिया भट ही सध्या बॉलिवूडमधल्या आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक मानली जाते. गली बॉयमधील तिच्या अभिनयाने अनेकांचे मन जिंकले. अभिनयात आलिया जेवढी माहीर आहे तेवढेच आलियाचे मन देखील मोठे आहे. आलियाने तिचा ड्रायव्हर सुनील व मदतनीस अनमोल यांना मुंबईत घर घेण्यासाठी प्रत्येकी पन्नास लाख रुपयांचे चेक दिले आहेत. आलियाच्या या दिलदारपणाचे नेटकऱ्यांनी देखील कौतुक केले आहे.

आलिया भटने 2012 साली ‘स्टुडंट ऑफ द इयर’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तेव्हापासून सुनील व अनमोल तिच्यासाठी काम करत आहेत. या दोघांनीही जुहू खार दांडा येथे घर बुक केले असून त्यासाठी आलियाने त्या दोघांनी प्रत्येकी पन्नास लाख रुपयांची मदत केली आहे.

आलिया सध्या तिचा आगामी चित्रपट कलंक च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात तिच्यासोबत माधुरी दिक्षीत, सोनाक्षी सिन्हा, संजय दत्त, वरुण धवन, आदित्य रॉय कपूर हे कलाकार आहेत. हा चित्रपट येत्या 17 एप्रिलला प्रदर्शित होणार आहेत.