
एलियन अर्थात परग्रहवासींबद्दल सर्वांनाच एक सुप्त आकर्षण असतं. वेळोवेळी त्यांच्याबद्दल येणाऱ्या खऱ्याखोट्या माहितीवरून त्या गूढतेत आणखी भर पडते. पण, आता एलियनविषयी खळबळजनक खुलासा करण्यात आला आहे.
काही एलियन्सनी पृथ्वीवरील काही महिलांसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले आहेत, अस दावा एका अहवालात करण्यात आला आहे. अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेने पेंटागन या संस्थेला यासंबंधीचे काही दस्तऐवज दिले आहेत. या अहवालाचं नाव अॅनोमॉलस अक्युट अँड सबअक्युट फिल्ड इफेक्ट्स ऑन ह्युमन अँड बायलॉजिकल टिश्यूज असं आहे.
या अहवालात अपहरण, गरोदरपणा, लैंगिक अत्याचार, बलात्कार, टेलिपथीसदृश्य आणि तत्सम अनुभव यांचा उल्लेख केला आहे. या अहवालात मानवी मादी आणि एलियन यांच्यात पाच लैंगिक अत्याचारांविषयी लिहिण्यात आलं आहे. या अत्याचारांतून काही महिला गर्भवतीही राहिल्याचा उल्लेख या अहवालात करण्यात आला आहे.
एलियनना प्रत्यक्ष पाहणारे किंवा त्यांचा अनुभव करणारे लोक जखमी होऊ शकतात. एलियनद्वारे फेकली जाणारी विकिरणं ही घातक असून त्यामुळे जळजळ, मेंदुंशी संबंधित समस्या, धमन्यांच्या कामात अडथळे असे त्रास उद्भवू शकतात. एलियनमुळे भविष्यात धोका उत्पन्न होऊ शकतो, असा दावाही या अहवालात करण्यात आला आहे.

























































