जालन्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ; तीन दिवस अंबड शहरात बाजारपेठ बंद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जालना जिल्ह्यात आणि अंबड शहरात कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सोमवारपासून ( 25 मे) ते बुधवारपर्यंत (27 मे) अंबड शहरातील बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय व्यापारी महासंघातर्फे घेण्यात आला आहे.

रविवारी अंबडमधील व्यापारी महासंघ, पोलीस प्रशासन, महसुल प्रशासन, आरोग्य विभाग, नगर परीषद विभाग यांची संयुक्त बैठक घेण्यात आली. बैठकीदरम्यान सोशल डिस्टन्सिंग पाळण्यात आले. जिल्ह्यातील व अंबड शहरातील वाढती कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता 25 ते 27 मे असे सलग तीन दिवस संपूर्ण बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच जिल्हातील कोरोना फैलाव रोखण्याबाबतही चर्चा करण्यात आली. सर्वानी आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी आणि पुढील 3 दिवस आपले व्यवहार बंद ठेवावेत, कोणत्याही व्यापाऱ्यांनी व्यापार करू नये, प्रशासनाला सहकार्य करावे असे अवाहन बैठकीत करण्यात आले.