
कोरोना महामारीत कोरोनाचे निदान हा नागरिकांना मूर्ख बनवण्याचा धंदा झालाय अशी टीका जगातील भल्याभल्या व्यक्तींनी केली आहे. त्यात आता जगातील पाचव्या क्रमांकाचे श्रीमंत आणि अमेरिकन टेस्ला कंपनीचे मालक एलन मस्क यांची भर पडली आहे.
मस्क यांनी आपल्या चार कोविड चाचण्या एकाच मेडिकल सेन्टरमध्ये केल्या. त्यातील दोन चाचण्यांचे निकाल निगेटिव्ह तर दोन चाचण्यांचे निकाल पॉझिटिव्ह आले आहेत. हा काय गडबड घोटाळा आहे असा सवाल आता मस्क यांनी वैद्यकीय यंत्रणांना केला आहे. एकाच यंत्रावर, एकाच केंद्रात केलेल्या कोरोना चाचण्यांचे निकाल वेगवेगळे कसे येतात असे मस्क यांनी विचारले आहे. आता मस्क यांनी केलेल्या अन्य लॅबमधील चाचण्यांच्या निकालावर सर्वांचे लक्ष लागले आहे.



























































