विसरणे हे गंभीर आजाराचे लक्षण असू शकते, जाणून घ्या कारणे

2191

बारीक-सारीक गोष्टी विसरणे हे गंभीर आजाराचे लक्षण असू शकते. पूर्वी लोकांना म्हातारपणात ही समस्या भेडसावत होती पण आजकाल अगदी लहान वयातील मुलांनाही ही समस्या येत आहेत. असे दिसून आले आहे की, जास्त ताण किंवा नैराश्यामुळे लोकांना स्मृतिभ्रंम होऊ लागला आहे. घराची चावी किंवा पाकिटात पैसे ठेवून विसरणे ही सामान्य गोष्ट नाही. किशोरवयात होणाऱ्या या आजाराला डिमेंशिया किंवा अल्झायमर म्हणतात. या आजाराच्या लक्षणांमध्ये स्मृतीची कमतरता, निर्णय घेण्यास असमर्थता, बोलण्यात अडचण आणि त्यानंतर सामाजिक आणि कौटुंबिक समस्यांमुळे गंभीर परिस्थिती उद्भवू शकते.
tan-1 1) ताण –
जर आपल्याला दीर्घकाळापर्यंत ताण किंवा इतर मानसिक आजारांचा सामना करावा लागला तर आपण अल्झाइमर या आजाराला बळी पडण्याची शक्यता आहे. परिस्थितीशी योग्यप्रकारे जुळवून न घेता आल्यामुळे जीवनातिल आनंद, स्वास्थ्य हरवलेल्या व्यक्तींची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. ताणतणावामुळे मद्यपान, धूम्रपान, अमलीपदार्थांचे सेवन या सारख्या व्यसनांच्या आहारी जाणाऱ्यांची संख्याही वाढली आहे. विविध कारणांमुळे तणाव जाणवतो आणि त्याचे परिणाम शरीरावर, वर्तनावर दिसतात. तणाव निर्माण करणारा प्रसंग मोठा किंवा लहान असतो, तसेच क्षुल्लक वाटणारा प्रसंगदेखील एखाद्या व्यक्तीमध्ये तणाव निर्माण करू शकतो.
tan-2 2) चिंतेचा आजार –
कारणाशिवाय किंवा छोट्याशा गोष्टींनीही चिंता वाटणे. स्नायूंमध्ये तणाव किंवा खेचल्यासारखे वाटणे. अचानकपणे हृदयाचे ठोके वाढणे किंवा धडधडणे. छातीत दुखणे किंवा भरल्यासारखे वाटने. हे सर्व चिंतेच्या आजाराची लक्षणे आहेत. जीवनातील अनेक लहान-मोठ्या प्रसंगांना सामोरे जाताना एखाद्या वेळी खूप भावूक वाटायला लागते. मनात खूप चिंता दाटून येते. काही तरी नकोसे होणार आहे वाईट होणार आहे मनाविरुद्ध होणार असे वाटते. अशा काही घटना आयुष्यात अचानक घडतात. साहजिकच मनात या घटनांमुळे घालमेल उठते व खूप काळजी वाटते. कधी कधी असे वाटणे प्रसंगानुरूप असते. पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांमध्ये अशा प्रकारच्या चिंतेच्या जाराचे प्रमाण जास्त आढळते.
tan-3 3) मल्टी टास्किंग –
एकाच वेळी अनेक कामं करणे म्हणजेच मल्टी टास्किंग होय. यामुळे मेंदुला एकाच वेळी अनेक सूचना मिळत असतात. एकाच वेळी बर्‍याच कामांमध्ये व्यग्र झाल्याने तुमच्या मेंदूच्या स्मृती शक्तीवर देखील परिणाम होतो. सन 2017 च्या एका अहवालानुसार मल्टी-टास्किंगमुळे 2.5 लोकांची विस्मृती वाढली.
tan-4 4) झोप न येणे
निद्रानाश ही एक समस्या आहे. वाढत्या वयानुसार ही समस्या भेडसावते. झोप ही आपल्या आरोग्यासाठीची अत्यावश्यक क्रिया आहे पण कुठल्याही गोष्टीची कमतरता किंवा अतिरेकही घातकच असतो. दिवसातून कमीत कमी 7 ते 8 तोस झोप घेणे महत्वाचे आहे. कारण त्याचा तुमच्या मेंदूवरील स्मृतीवर परिणाम होतो. कमी झोपेमुळे केवळ आपले आरोग्यच बिघडत नाही तर हळूहळू आपल्यासाठी गोष्टी लक्षात ठेवणे कठीण होते.
tan-5
5) थायरॉइड  –
औषधे आपल्या मानसिक आरोग्यावरही परिणाम करतात.  थायरॉइड या आजारामध्ये दिलेली औषधे आपल्या मेंदूवर थेट परिणाम करतात. आजकाल बरेच लोक थायरॉईड या रोगाने ग्रस्त आहेत. थायरॉईडमध्ये वजन वाढण्यामुळे हार्मोनचे असंतुलन होते. महिलांमध्ये पुरुषांपेक्षा दहापट जास्त थायरॉईड डिसऑर्डर आहेत. याचे मुख्य कारण म्हणजे स्त्रीयांमध्ये ऑटोम्यून्यूनची समस्या अधिक आहे.  तणावामुळे थायरॉईड हा आजार होतो म्हणून ताण टाळण्याचा प्रयत्न करा.tan-66) औषधउपचार –
पार्किंसंस सारखा आजार लवकर पसरणारा आजार आहे. या रोगाच्या सुरवातीला चेहऱ्यावरचे हाव-भाव संपतात. या आजाराने ग्रस्त लोकांना दिलेली औषधे  थेट मानसिक आरोग्यावर परिणाम करतात. या आजारामध्ये दिलेली औषधे मेंदूवर थेट परिणाम करतात.

आपली प्रतिक्रिया द्या