हर हर महादेव… बम बम भोले; अमरनाथ यात्रेचा पहिला जत्था रवाना

अमरनाथ यात्रेसाठी भाविकांचा पहिला जत्था बुधवारी जम्मूहून रवाना झाला. जम्मू-कश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी भगवती नगर बेस कॅम्प येथून या जत्थ्याला हिरवा कंदील दाखवला. यानंतर भाविकांनी ‘हर हर महादेव’ आणि ‘बम बम भोले’चा जयघोष केला. ही यात्रा अधिकृतपणे उद्या, 3 जुलै 2025 पासून सुरू होणार आहे. ही यात्रा 38 दिवस चालणार असून 9 ऑगस्टला रक्षाबंधनाच्या दिवशी संपणार आहे. गेल्या वर्षी ही यात्रा 52 दिवस चालली होती. तसेच 5 लाख भाविकांनी पवित्र गुहेचे दर्शन घेतले होते. यंदाच्या अमरनाथ यात्रेसाठी आतापर्यंत साडेतीन लाखांहून अधिक भाविकांनी नोंदणी केली आहे. तत्काळ नोंदणीसाठी जम्मूमधील सरस्वती धाम, वैष्णवी धाम, पंचायत भवन आणि महाजन सभा येथे केंद्रे उघडण्यात आली आहेत. या केंद्रांवर दररोज दोन हजार यात्रेकरूंची नोंदणी केली जात आहे.