अ‍ॅमेझॉनने 100 कर्मचाऱ्यांना कामावरून काढले

अ‍ॅमेझॉनने कर्मचारी कपात सुरूच ठेवली आहे. कंपनीने यावेळी बुक्स डिव्हिजन ज्यामध्ये गुडरिड्स रिह्यू प्लॅटफॉर्म आणि किंडल यूनिटमधील 100 कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकले आहे. बुक्स बिझनेसला ऑपरेशनल पद्धतीला चांगले करण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. या कर्मचारी कपातीआधी डिव्हाईसेस आणि सर्विसेज, वंडरी पॉडकास्ट, स्टोअर्स आणि कम्युनिकेशन टीम्समधील कर्मचाऱयांनासुद्धा घरचा रस्ता दाखवला होता. दरम्यान, टेक कंपन्यांमध्ये जोरदार कर्मचारी कपात करण्यात येत असल्याने कर्मचारी चांगलेच धास्तावले आहेत.