ऍमेझॉनवर कोविड-19 सप्लाइज स्टोर, मिळणार मास्क, सॅनिटायजर, ग्लोव्हज

175

ऍमेझॉन बिजनेसने आज ‘कोविड-19 सप्लाइज स्टोर’ सुरू केले आहे. त्यामुळे आता आरोग्य संघटना, रुग्णालये या स्टोरवरून कोविड-19 संबंधित आवश्यक वस्तूंची एकत्रितपणे मोठ्या प्रमाणात खरेदी करू शकतात.

‘कोविड-19 सप्लाइज स्टोर’ ची रचना खास करून अत्यावश्यक वैद्यकीय आणि सुरक्षात्मक वस्तूंचा तात्काळ पुरवठा होण्यासाठी करण्यात आली आहे. ग्राहकांना एक-एक प्रॉडक्ट शोधण्यासाठी वेळ घालवण्याची आवश्यकता नाही. या स्टोरमध्ये मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या वस्तूंचा साठा केलेला आहे जसेकी एन95 मास्क, सर्जिकल मास्क, सॅनिटायजर, पर्सनल प्रोटेक्टीव इक्वीपमेंट (पीपीइ) किट, ग्लोव्ज, शू कव्हर, पीपीइ सूट्स, फेशियल शिल्ड, इंफ्रारेड थर्मामीटर्स आणि आम्ही पुढेही यामध्ये प्रॉडक्ट समाविष्ट करत आहोत.

या उपक्रमाबद्दल बोलतांना, ऍमेझॉन इंडियाचे कॅटेगरी मॅनेजमेंटचे वाइस प्रेसिडेंट मनिष तिवारी म्हणाले, “ ‘कोविड-19 सप्लाइज स्टोर’ हा सेफ्टी आणि सॅनिटायजेशन प्रॉडक्टची आवश्यकता असलेल्या खरेदीकारांना एकाच ठिकाणी सर्व वस्तू उपलब्ध करण्यासाठीचा आमचा प्रयत्न आहे. देश सातत्याने या विषाणूसह लढत असल्यामुळे आरोग्यनिगा व्यावसायिक आणि संघटनांना सातत्याने मोठ्या प्रमाणात खरेदी करण्याची आवश्यकता असते. या महत्वपूर्ण वेळेत, देशभरातील ग्राहकांना ही उत्पादने तात्काळ उपलब्ध करून देऊन राष्ट्राप्रती सेवा करण्यास ऍमेझॉन वचनबद्ध आहे.”

अधिक माहितीसाठी, कोविड 19 सप्लाइज स्टोरला भेट द्या – www.amazon.in/covidstore.

आपली प्रतिक्रिया द्या