ऍमेझॉनने 190 रुपयांत नाही दिला लॅपटॉप, आता 45 हजार रुपयांचा बसला दंड

फेस्टिव सीजनमध्ये इ कॉमर्स कंपन्यांकडून स्पेशल ऑफर असतात. असे असले तरी ऍमेझॉनला ही एक फेस्टिव सीजनमध्ये फटका बसला आहे. दिलेल्या ऑफरमध्ये वस्तू न दिल्याने न्यायालयाने ऍमेझॉनला दंड ठोठावला आहे.

2014 मध्ये डिसेंबर महिन्यात ऍमेझॉनने एक फेस्टिव सीजन आयोजित केला होता. त्यात ओडिशाच्या सुप्रियो रंजन या विद्यार्थ्याने 190 रुपयांत एक लॅपटॉप ऑर्डर केला होता. परंतु नंतर ऍमेझॉनने या प्रोडक्टची डिलिव्हरीच दिली नाही. त्यानंतर सुप्रियोने ग्राहक पंचायतीत धाव घेतली.

सुप्रियोची तक्रार ऐकल्यानंतर ओडिशा ग्राहक पंचायतने ऍमेझॉनला मानसिक त्रास दिल्याबद्दल 40 हजार रुपयांचा दंड ठोठावला. तसेच ग्राहकाला खटला लढवा लागला म्हणून 5 हजार रुपये देण्याचेही आदेश दिले.

लॅपटॉप न मिळाल्याने अभ्यासाचे नुकसान

ऍमेझॉनने लॅपटॉपची डिलिव्हरी न दिल्याने सुप्रियोला मानसिक त्रास झाला. इतकेच नाही त्याच्या अभ्यासाचे नुकसान झाले शेवटी सुप्रियोला 22 हजार 899 रुपयाचा नवीन लॅपटॉप विकत घ्यावा लागला.

ऍमेझॉनच्या सेवेवर प्रश्नचिन्ह

ऍमेझॉनने 23 हजार 499 रुपये मूळ किंमत असलेला लॅपटॉप प्रमोशनल डिस्काऊंट देऊन 190 रुपयांत विक्रीस काढला होता. पण ग्राहकाला योग्य ती सेवा न दिल्याने ग्राहकाला मनस्ताप झाला. त्यामुळे ग्राहक पंचायतने ऍमेझॉनला हा दंड ठोठावला.

आपली प्रतिक्रिया द्या