अॅमेझॉन पार्सल जलद पोहोचवण्यासाठी करणार मध्य रेल्वेचा वापर

413

ई-कॉमर्स जगतातील अॅमेझॉन कंपनी आता आपले पार्सल ग्राहकांपर्यंत जलद पोहोचवण्यासाठी कल्याण ते सीएसएमटीपर्यंत मध्यरेल्वेच्या माल डब्ब्याचा वापर करणार आहे. या कराराला मध्य रेल्वेने गुरुवारी मान्यता दिली. अॅमेझॉन कंपनीला यासाठी पैसे मोजावे लागणार आहे. अॅमेझॉनचे भिवंडी येथे हब असून, एक टन पार्सलमागे वाहतूक करण्याचे मध्य रेल्वे 848 रुपये अॅमेझॉन कंपनीकडून आकारणार आहे. एकूण 8 टन पार्सल कल्याण ते सीएसएमटीमध्ये भागात पोहोचवण्यासाठी  मध्य रेल्वेच्या आठ डब्यांचा वापर अॅमेझॉन कपंनीला करता येणार आहे. तर यातून तीन महिन्याला मध्य रेल्वेला 6.1 लाख मिळणार असल्याची माहीती मध्य रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांने दिली. रेल्वेच्या एका मालडब्ब्यातून 1.3 टन मालाची वाहतूक करता येऊ शकते.

अॅमेझॉन आणि मध्य रेल्वेला या करारातून फायदा होणार आहे. यामुळे मध्य रेल्वेच्या महसूलात वाढ होणार आहे. तसेच अॅमेझॉनचाही वाहतूकीचा वेळ वाचणार आहे. ई-कॉमर्सच्या कर्मचाऱ्यांना आपल्या पार्सल मालासाठी रेल्वेचा मधला माल डब्बा आरक्षित असणार आहे. मात्र कमी गर्दीच्या वेळेत (नॉन पिक अवर्स) कल्याण ते सीएसएमटीपर्यंत अॅमेझॉन कंपनीच्या कर्मचाऱ्यांना माल घेऊन प्रवास करता येणार आहे, अशी माहिती मध्य रेल्वे जनसंपर्क अधिकारी प्रमुख शिवाजी सुतार यांनी दिली. ई-विक्रेत्यांना आपला माल जलद पोहोचवण्यासाठी रोड वाहतुकी व्यतिरिक्त रेल्वे सोयीस्कर आहे. कंपनीला आपले पार्सल भिवंडी हबमधून कल्याणला रस्त्याने आणून रेल्वेचा वापर करता येऊ शकतो, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

रेल्वेबरोबर आम्ही दीर्घकाळ भागीदारीसाठी वचनबद्ध आहोत. रेल्वेमुळे ग्राहकांचे पार्सल वेळेवर पोहोचण्यास शक्य आहे. आम्ही प्रायोगिक तत्वावर वेगवेगळ्या मार्गावर वाहतूक करत आहे. सध्या मुंबईच्या उपनगरात ई-कॉमर्सची पार्सल ग्राहकांपर्यत पोहोचवणार असल्याची माहिती अॅमेझॉनच्या प्रवक्यांनी दिली. ऑक्टोबर 2019 मध्ये कोलकाता उपनगरात सीलदा ते डंकुनी येथे अॅमेझॉनने पार्सल ग्राहकापर्यंत पोहोचवण्यासाठी पुर्वेकडील रेल्वेबरोबर तीन महिन्य़ाचा प्रायोगिक तत्वावर प्रकल्प सुरु केला होता. कमी गर्दीच्या वेळेत रेल्वेच्य़ा माल डब्ब्याचा वापर पार्सलचा माल ठेवण्यासाठी केला जात होता. तोच प्रकल्प मुंबईत पुढच्या महिन्यापासून सुरु केला जाणार आहे. यासाठी अॅमेझॉन आणि मध्य रेल्वेत करारही झाला आहे. अॅमेझॉनना आपला माल काही निश्चित स्थानकावरच उतरवणार आहे. त्यात सीएसएमटी, दादर, ठाणे आणि कल्याण आदी स्थानकांचा सामावेश आहे. या करारातून  मध्य रेल्वेला या करारानंतर तीन महिन्याला सहा लाखांचा महसूल मिळणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या