वाल्मीक कराडला तुरुंगात व्हिआयपी ट्रीटमेंट, माझ्या समोर बसलेल्या व्यक्तीला केलेला फोन;अंबादास दानवे यांचा आरोप

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मीक कराड याला तुरुंगात व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याचे समोर आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी आज पत्रकार परिषदेत बोलताना याबाबत धक्कादायक दावे केले आहेत.

शिवसेना नेते व विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी छत्रपती संभाजीनगर येथे पत्रकार परिषदेत घेतली. यावेळी बोलताना ते म्हणाले की, ” कृषी विभागात घोटाळा झालेला आहे. आताही वाल्मीक कराड जेलमधून सर्व काही हाताळत आहे.काही दिवसांपूर्वी माझ्या समोर बसलेल्या एका व्यक्तीला तुरुंगातूनच वाल्मीक कराडचा फोन आला होतामी हे तीन महिन्यांपासून सांगत आहे. याची चौकशी व्हायला हवी होती.