मळणी यंत्रात शाल अडकून वृद्धाला बसला फास, जागीच मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । अंबाजोगाई

मळणी यंत्रात सोयाबीन काढत असताना गळ्यातील शाल मळणी अडकून फास बसल्याने 70 वर्षीय वृद्धाचा रविवारी मृत्यू झाला. वैजीनाथ कुंडलीक जोगदंड असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

बर्दापूर येथील वैजीनाथ कुंडलीक जोगदंड हे आपल्या शेतातील सोयाबीनचे खळ मळणी यंत्राद्वारे काढत होते. वैजीनाथ यांनी थंडी वाजू नये म्हणून गळ्यामध्ये शाल घेतलेली होती. मळणी यंत्रात सोयाबीन टाकत असताना गळ्यातील शाल मळणी यंत्रात अडकली. त्यात त्यांना शालेचा जोरदार फास बसला. त्यांना तात्काळ अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तिर्थ रूग्णालयात दाखल करण्यात आले. रूग्णालयात दाखल केल्यानंतर तेथील डॉक्टरांनी वैजीनाथ जोगदंड यांना मयत घोषीत केले. या प्रकरणी बर्दापूर पोलीस ठाण्यामध्ये आकस्मात मृत्युची नोंद झाली असून या घटनेचा तपास पो.हे.कॉ.राठोड हे करत आहेत.