मोफत आरोग्य तपासणी शिबिर

ग्रॅण्ड मराठा फाऊंडेशन या स्वयंसेवी संस्थेने अंबरनाथ येथे मोफत वैद्यकीय तपासणी शिबिराचे आयोजन केले होते. यावेळी फाऊंडेशनच्यावतीने परिसरामध्ये मोफत औषधांचे वाटप करण्यात आले. फाऊंडेशनच्या विश्वस्त माधवी शेलटकर, संस्थापक रोहित शेलटकर यांच्या सहयोगाने या वैद्यकीय शिबिराचे आयोजन केले होते. याप्रसंगी प्रमुख अतिथी मेयेर किटाबायोटिक्सचे संचालक राजेश तावडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करत महामारीदरम्यान आरोग्यदायी व सुरक्षित राहण्याचे महत्व पटवून दिले.

आपली प्रतिक्रिया द्या