जनता कर्फ्यूला जनतेने दिलेल्या प्रतिसादाबाबत अमेरिकेकडून प्रशंसा!

1566

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन देशातील जनतेला केले होते. पंतप्रधानांच्या या आवाहनाला नागरिकांनी उत्स्फूर्ततनेने प्रतिसाद दिला. केवळ एका आवाहनानंतर जनतेने दाखवलेली एकजूट महत्त्वाची असल्याचे अमेरिकेने म्हटले आहे. आता कोरोना हे जागतिक संकट झाले असून त्याविरोधात संपूर्ण जगाने एकत्र येण्याची गरज व्यक्त होत आहे. देशांनी परस्परातील मतभेद या जागतिक शत्रूविरोधात एकत्र येण्याचे आवाहन संयुक्त राष्ट्रांनी केले आहे. या जागतिक घडामोडींच्या पार्श्वभूमीवर हिंदुस्थानी नागरिकांनी दाखवलेल्या एकजूट वाखाखण्याजोगी आहे, असे मत अमेरिकेतील नागरिकांकडून सोशल मिडीयावर वक्त करण्यात येत आहे.

अनेकांनी जनता कर्फ्यूचे स्वागत केले असले तरी काहीजणांनी थाळीनाद आणि घंटानाद करण्यासाठी नागरिक एकत्र आल्याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. अशा काही उत्साही नागरिकांमुळे अनेक नागरिकांच्या आरोग्याला धोका असल्याचे सोशल मिडीयावर म्हटले आहे. या रोगावर कोणताच औषधोपचार किंवा लस नसल्याने सोशल डिस्टनिंग हा एकच उपाय आहे. जगभरात कायद्याचे कठोर अंमलबजावणी केल्यानंतरच नागरिक घरात थांबले. अशा प्रकाराच्या कठोर कारवाईला विरोधही करण्यात आला. मात्र, हिंदुस्थानने कोरोनाचा संभाव्य धोका ओळखून योग्य त्या उपाययोजना केल्या. तसेच पंतप्रधानांच्या एका आवाहनला प्रतिसाद देत जनतेने उत्स्फूर्ततेने कर्फ्यूचे पालन केले. त्यामुळे हिंदुस्थानी जनतेचे कौतुक करण्यासारखी बाब आहे. मात्र, जनतेने परिस्थितीचे गांभीर्य ओळखून स्वतःहून गर्दीत जाणे टाळणे गरजेचे आहे. हे प्रेरणादायी असल्याचे मत अमेरिकेतील नागरिकांनी सोशल मीडियावर म्हटले आहे. तसेच जनता कर्फ्यू आणि थाळीनद आणि घंटानाद यांचे फोटो आणि व्हिडिओही मोठ्या प्रमाणात सोशल मिडीयावर व्हायरल होत असून त्यावर चर्चा सुरू आहे.

आपली प्रतिक्रिया द्या