अमेरिकेचे हमासवर आर्थिक निर्बंध, दहा सदस्यांवर घातली बंदी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इस्रायल आणि हमासमधील युद्धाने भयंकर रुप घेतले आहे. दोन्ही देश एकमेकांवर हल्ले करत असून यात आतापर्यंत हजारो लोकं मारली गेली आहेत. या युद्धात मुस्लीम देश हे हमासला पाठींबा देत आहेत. तर अमेरिकेने इस्रायलला पाठिंबा दिला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी इस्रायलला पाठिंबा असल्याचे जाहीर केले आहे.

अमेरिकेने हमासवर आर्थिंक निर्बंध लादले असून त्यांच्या दहा सदस्यांवर बंदी घातली आहे. तसेच गाझा सुदान, तुर्कस्तान, अल्जेरिया आणि कतारमध्ये आर्थिक व्यवहारांवरही बंदी घातली आहे. त्यामुळे आता अमेरिकेने पॅलेस्टाईनच्या आर्थिक नाड्या आवळण्यास सुरुवात केली आहे.

इस्रायल आणि पॅलेस्टाईनच्या युद्धात आणि अमेरीकाही रडारवर आहे. अमेरीकेचा इस्रायला पाठिंबा असल्याने संतापलेल्या लोकांनी लेबेनॉनमध्ये अमेरीकेच्या दूतावासावर हजारोंच्या संख्येने हल्ला करत दूतावासाला आग लावली आहे.

मंगळवारी इस्रायलच्या गाझापट्टीतील रुग्णालयावर मिसाईल हल्ला केला होता. ज्यामध्ये 500 लोकांना त्यांचा प्राण गमवावा लादला. या घटनेनंतर लेबेनॉनमधील अमेरिकन दूतावासाबाहेर हजारोंचा जमाव जमला होता. या लोकांच्या हातात पॅलेस्टाईनचे झेंडे होते आणि ते अमेरिका, इस्रायलच्या विरोधात घोषणा देत होते. दरम्यान, जमावातील काही लोकांनी दूतावासालाच आग लावली. एवढेच नाही तर काही लोकांनी दूतावासातून अमेरिकन ध्वज काढून पॅलेस्टाईनचा ध्वज लावण्याचा प्रयत्नही केला.