
कोरोना महामारीमुळे केवळ जीवितहानीच झाली नाही तर लॉकडाऊनचा मोठा फटका जगातील सर्वच देशांच्या अर्थव्यवस्थेला बसला आहे. महासत्ता अमेरिकेने आपल्या जनतेला आधार देताना तब्बल 900 अब्ज डॉलर्सच्या पॅकेजची घोषणा केली आहे. ख्रिसमसच्या पार्श्वभूमीवर उद्योगांपासून सामान्य जनतेपर्यंतचा विचार या पॅकेजमध्ये केला आहे. विशेषतः बेरोजगार अमेरिकन नागरिकाला प्रतिमहिना 1200 डॉलर्स (सुमारे 88 हजार रुपये) तर गरजूंना 2400 डॉलर्स (सुमारे 176000 रुपये) भत्ता देण्यात येणार आहे. अमेरिकन काँग्रेसमध्ये (संसदेत) या बिलास मंगळवारी मंजुरी देण्यात आली.
पॅकेजमध्ये सर्वांचा विचार
अल्प उत्पन्न, सामान्य कुटुंबातील गरजूंना आठवडय़ाला 600 डॉलर्स म्हणजे महिन्याला 2400 डॉलर्स (सुमारे 176000 रुपये) भत्ता.
लहान उद्योगांसाठी 284 अब्ज डॉलर्सचे पे-चेक प्रोटेक्शन.
उद्योगांना कर्जाची परतफेड करता येईल.
उद्योगांनी उभारी घेतल्यास बेरोजगारी कमी होईल.
अल्प उत्पन्न गटातील नागरिक, भाडय़ाच्या घरातील नागरिकांसाठीही विशेष तरतूद.
गरजू मुलांच्या पोषणासाठीही विशेष कार्यक्रम राबविणार.




























































