
अमेरिकेने द रेझिस्टन्स फ्रंट (टीआरएफ) ला परदेशी दहशतवादी संघटना घोषित केले आहे. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. अमेरिकेचे कौतुक करताना ते म्हणाले की, या निर्णयामुळे हिंदुस्थान आणि अमेरिका दहशतवादाविरुद्ध एकत्र उभे आहेत हे सिद्ध झाले आहे. जयशंकर यांनी शुक्रवारी X वर एक पोस्ट शेअर करून अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांचेही कौतुक केले आहे.
A strong affirmation of India-US counter-terrorism cooperation.
Appreciate @SecRubio and @StateDept for designating TRF—a Lashkar-e-Tayyiba (LeT) proxy—as a Foreign Terrorist Organization (FTO) and Specially Designated Global Terrorist (SDGT). It claimed responsibility for the…
— Dr. S. Jaishankar (@DrSJaishankar) July 18, 2025
एस जयशंकर यांनी X पोस्टमध्ये लिहिले आहे की, “हिंदुस्थान आणि अमेरिका दहशतवादाविरुद्ध एकत्र उभे आहेत हे स्पष्ट झाले आहे. मार्को रुबियो आणि अमेरिकेचे आभार, ज्यांनी लष्कर-ए-तैयबा (LeT) ची प्रतिनिधी संघटना TRF ला परदेशी दहशतवादी संघटना (FTO) आणि विशेष नियुक्त जागतिक दहशतवादी (SDGT) घोषित केले. त्यांनी 22 एप्रिलला झालेल्या पहलगाम हल्ल्याची जबाबदारी घेतली होती.” TRF ने अनेक दहशतवादी घटना घडवून आणल्या आहेत.
TRF ही पाकिस्तानमधून कार्यरत असलेल्या लष्कर-ए-तैयबाची एक संघटना आहे. या संघटनेने आतापर्यंत अनेक दहशतवादी कारवाया घडवून आणल्या आहेत. पहलगाममधील हल्ल्याची जबाबदारी TRF ने घेतली होती. यामध्ये 26 पर्यटकांना आपले प्राण गमवावे लागले होते. अमेरिकेने आता TRF ला दहशतवादी संघटना घोषित केले आहे. हा पाकिस्तानसाठी मोठा धक्का आहे. टीआरएफला दहशतवादी संघटना घोषित केल्यानंतर त्यांच्या अडचणी वाढतील.