अवघे जग टेन्शनमध्ये! इराणमधील 52 ठिकाणे अमेरिकेच्या रडारवर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
Fort Bragg: This photo provided by the U.S. Army, paratroopers assigned to 1st Brigade Combat Team, 82nd Airborne Division walk as they prepare equipment and load aircraft bound for the U.S. Central Command area of operations from Fort Bragg, N.C., Saturday, Jan. 4, 2020. AP/PTI(AP1_5_2020_000017B)

अमेरिका-इराणमधील वाढत्या तणावामुळे संपूर्ण जग टेन्शनमध्ये आले आहे. ड्रोन हल्ल्याला इराणने दोन रॉकेटचा मारा करून प्रत्युत्तर दिल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणची 52 ठिकाणे उद्ध्वस्त करण्याची धमकी दिली आहे. इराणने 1979 साली अमेरिकेच्या 52 नागरिकांना ओलीस ठेवले होते. त्यामुळे इराणची तेवढय़ाच संख्येतील ठिकाणे हल्ल्यांनी हादरवण्याचा निर्धार ट्रम्प यांनी केला आहे.

अमेरिकेने ड्रोन हल्ला करून इराणचे लष्करप्रमुख जनरल कासीम सुलेमानी यांची हत्या केल्यानंतर दोन्ही देशांमध्ये तणाव वाढला आहे. त्याचा संपूर्ण जगाने धसका घेतला आहे. विविध देशांचे प्रतिनिधित्व करणाऱया युरोपिय संघाच्या वतीने परराष्ट्र धोरणप्रमुख जोसेफ बॉरेल यांनी शांततेसाठी पुढाकार घेतला आहे. त्यांनी ब्रसेल्समध्ये इराणचे परराष्ट्र मंत्री मोहम्मद जावेद जरीफ यांच्याशी चर्चा केली. परिस्थिती चिघळू न देण्याचे तसेच इराण व संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेतील देशांमध्ये झालेल्या अण्वस्त्र्ा कराराचे पालन करण्याचे आवाहन त्यांनी जरीफ यांना केले. सुलेमानी यांनी अमेरिकन राजदूत तसेच बगदादमध्ये तैनात 5200 अमेरिकन सैनिकांवर हल्ल्याचा कट रचला होता, असा दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे.

अमेरिकन लष्करी तळावर दहशतवादी हल्ला

केनियातील अमेरिकन लष्करी तळावर रविवारी सकाळी दहशतवादी हल्ला झाला. ‘अल-कायदा’शी संलग्न असलेल्या अल-शबाब या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. अल-शबाब संघटनेची काही अफ्रिकी देशांवर दहशत आहे. अल-शबाब आणि अमेरिकन सैन्यामध्ये रविवारी उशिरापर्यंत गोळीबार सुरू होता.

आम्हीच जगात सर्वश्रेष्ठ, कुठल्याही हल्ल्याला उत्तर देऊ

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आमचेच सैन्य संपूर्ण जगात सर्वश्रेष्ठ असून कुठल्याही प्रकारच्या हल्ल्याला उत्तर देण्यास सक्षम आहोत, असा इशारा इराणला दिला. अमेरिकेने सैन्याच्या शस्त्रास्त्रांवर दोन ट्रिलियन डॉलर खर्च केले आहेत. इराणने जर आमच्या लष्करी तळावर वा नागरिकांवर हल्ला केला, तर आम्हीही नवीन शस्त्रास्त्रे धाडू, कसलीही तमा न बाळगता, असे ट्विट ट्रम्प यांनी केले.

n अनेक देशांच्या राष्ट्राध्यक्ष, परराष्ट्र मंत्र्यांनी फोनाफोनी करून दोन्ही देशांना शांत करण्याचे प्रयत्न चालवले आहेत. चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी अमेरिकेला लष्कराच्या ताकदीचा गैरवापर न करण्याचा सल्ला दिला आहे. यी यांनी रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव यांच्याशी फोनवरून बातचीत केली. दुसरीकडे प्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रोन यांनी रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन, तुर्कीचे राष्ट्रपती रिसेप तैय्यप यांना फोन केला. तसेच ब्रिटन, सिरिया, कतर आदी देशांच्या परराष्ट्र मंत्रालयांनीही शांततेवर भर दिला आहे.