अभिमान आणि आनंद! अमेरिकेकडून पार्टनर हिंदुस्थानची प्रशंसा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चंद्रस्पर्शाची अभिमानास्पद कामगिरी पार पाडून अवकाश संशोधन क्षेत्रातील मोजक्या महासत्तांमध्ये अढळ पद मिळवणाऱया हिंदुस्थानची विविध देशांकडून वाहवा होत आहे. अवकाश संशोधन क्षेत्रात आपण दोघे जोडीदार असल्याचा अभिमान आणि आनंद वाटतो, अशी प्रशंसा अमेरिकेने केली आहे.

या मोहिमेत व अंतराळ संशोधनातही तुमच्याबरोबर सहभागी असल्याचा अभिमान वाटतो, असे अमेरिकेच्या नॅशनल स्पेस काwन्सिलच्या प्रमुख आणि अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरीस यांनी एक्सवर म्हटले आहे. तर नासाचे प्रशासक बिल नेल्सन यांनाही इस्रोचे अभिनंदन केले आहे.