तालिबान-अमेरिका शांतता चर्चा फिस्कटली, अफगाणिस्तानवरून पाकिस्तानला झटका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अमेरिका व अफगाणिस्तानमध्ये तैनात असलेले आपले सैन्य मागे घेणार आहे, मात्र त्या आधी अफगाणिस्तानची अंतर्गत सुव्यवस्था लावण्यासाठी अमेरिका पाकिस्तानसह तालिबानशी चर्चा करणार होता. तशी घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली होती, मात्र आता अमेरिकेने तालिबानशी चर्चा करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

चर्चेत काय ठरणार होते

अमेरिका आणि तालिबान यांच्या चर्चेनंतर अमेरिका 135 दिवसांमध्ये आपले जवळजवळ 5 हजार 400 सैन्य अफगाणिस्तानमधून मागे घेणार होती तर तालिबान ‘अल कायदा’सारख्या संघटनेबरोबर कोणतेही संबंध ठेवणार नाही असे चर्चेवेळी ठरणार होते. चर्चेच्या आधी अमेरिका आणि तालिबान यांच्यात जवळजवळ 8 गुप्त बैठका झाल्या होत्या. अंतिम बैठकीत त्यावर शिक्कामोर्तब होणार होते, मात्र त्याआधीच ही चर्चा फिस्कटली.

हिंदुस्थान–अफगाणिस्तानचा होता विरोध

अफगाणिस्तानात शांतता निर्माण व्हावी यासाठी पाकिस्तानसह तालिबान आणि अमेरिकेची चर्चा होणार होती. या चर्चेला हिंदुस्थान आणि अफगाणिस्तानने विरोध केला होता. अशा प्रकारच्या शांतता चर्चेमुळे अफगाणिस्तानमध्ये पुन्हा यादवी सुरू होईल, तसेच या यादवीचा गैरफायदा पाकिस्तान उठवून कश्मीरमध्ये पुन्हा दहशतवादी हल्ले घडवून आणेल असे हिंदुस्थानने आधीच सांगितले होते. त्यामुळे ही चर्चा रद्द झाल्याने पाकिस्तानला झटका बसला आहे. दरम्यान, तालिबानबरोबर अमेरिकेने चर्चा करावी अशी भूमिका पाकिस्तान आणि रशियाने घेतली होती.