
अमेरिकन इन्फ्लुएन्सर रिकी पॉन्ड यांचा एक नवीन व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ खास नवरात्रीनिमित्त आहे. ‘ढोलिडा’ या हिट ट्रकवर रिकी यांनी धमाकेदार डान्स केला आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये रिकी फॉर्मल पोशाखात दिसत आहेत. त्यांनी अगदी गुजराती ठेका धरला आहे. त्यांच्या ऊर्जेने नेटकऱयांना चांगलेच प्रभावित केले आहे. रिकी हिंदुस्थानी संस्कृतीचे दर्शन आपल्या स्टाईलने घडवतात, त्याचे कौतुक होते. रिकी पॉन्ड हिंदुस्थानी संगीतावरील त्यांच्या प्रेमामुळे चर्चेत येण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. गेल्या काही वर्षांत त्यांनी अनेक हिट गाण्यांवर डान्स व्हिडीओ सादर केले आहेत. त्यामुळे त्यांचा एका वेगळाच चाहता वर्ग तयार झाला आहे.