
‘देव जेव्हा देतो तेव्हा छप्पर फाडून देतो’ या म्हणीचा प्रत्यय नुकताच अमेरिकेतील एका व्यक्तीला आला आहे. हा व्यक्ती आपल्या मुलीसाठी स्कूल बॅग आणायला गेला होता. वाटेत त्याने लॉटरीचे तिकीट खरेदी केले अन् याच तिकिटामुळे या व्यक्तीचे नशीब फळफळले आहे. त्याला तब्बल 7 कोटी 42 लाख रुपयांची लॉटरी लागली आहे. ही घटना फ्लोरिडा येथे घडली आहे.
47 वर्षीय क्लिव्हलँड पोप असे या लॉटरी विजेत्याचे नाव आहे. ते ब्रुक्सविलेमध्ये राहतात. लॉटरी अधिकाऱयांशी बोलताना ते म्हणाले, मी मुलीसाठी स्कूल बॅग शोधत होतो, मात्र याचदरम्यान माझ्या मनात लॉटरीचे तिकीट घेण्याचा विचार आला. मी तसे केलेदेखील. याच तिकिटाने मला एका झटक्यात करोडपती बनवले आहे. ज्या स्टोअरमधून त्यांनी लॉटरी घेतली त्या दुकान मालकाला दोन हजार डॉलरचे बक्षीस देण्याचे क्लिव्हलँड यांनी ठरवले आहे.




























































