अभिनेत्रीच्या ओव्हर अॅक्टिंगमुळे नेटकरी संतापले, बिगबॉसमधून हकालपट्टीची मागणी

2143

सलमान खानच्या बिग बॉसचे 13 वे पर्व नुकतेच सुरू झाले आहे. यंदा कार्यक्रमात थोडा ट्विस्ट आणण्यासाठी निर्मात्यांनी अमिषा पटेलला घराची मालकीण बनवले असून तिला काही अधिकार दिले आहेत. मात्र बिग बॉसमध्ये झळकत असलेली अमिषा ही ओव्हर अॅक्टिंग करत असल्याचा आरोप नेटकऱ्यांनी केला असून तिची घरातून हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे.

amisha-paterl-big-boss

सोशल मीडियावर अमिषा पटेलला मोठ्या प्रमाणात ट्रोल केले जात असून तिच्यामुळे बिग बॉस बघणे असह्य होत असल्याची टीका नेटकऱ्यांनी केली आहे. तसेच अमिषा या कार्यक्रमात येऊन कार्यक्रमाची मजा घालवत आहे व असे सुरूच राहिल्यास या कार्यक्रमाचा टीआरपी घसरेल असा इशाराही काही नेटकऱ्यांनी दिला आहे. काहींनी तर अमिषाच्या ओव्हरअॅक्टिंगपेक्षा राखी सावंत बरी असे देखील म्हटले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या