
कॅन्सर रुग्णांच्या उपचारांसाठी निधी संकलन या उद्देशाने नुकतेच लाईव्ह इन कॉन्सर्ट आयोजित करण्यात आले. यामध्ये प्रसिद्ध गायक अमित कुमार आणि त्यांचे बंधू सुमित कुमार यांनी गाणी सादर केली. अमित कुमार यांची मुलगी मुक्तिका गांगुली ही कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण होते.
कॅन्सर पेशंट्स एड असोसिएशन (सीपीएए) यांच्या सहकार्याने वांद्रे येथील सेंट अँड्रय़ूज ऑडिटोरियममध्ये शनिवारी कार्यक्रम रंगला. यावेळी किशोर कुमार यांच्या पत्नी लीना चंदावरकर, ज्येष्ठ अभिनेते अन्नू कपूर, सीपीएएचे संस्थापक अध्यक्ष वाय. के. सप्रू तसेच अलका सप्रू बिसेन आणि अनिता पीटर उपस्थित होत्या.
सीपीएए ही एक नोंदणीकृत संस्था असून ती गेली 54 वर्षे कर्करोगाने पीडित रुग्णांसाठी काम करते. या संस्थेने रुग्णांना विनामूल्य औषधे, अन्नपदार्थ, ऍम्ब्युलन्स सेवा, प्रोस्थेसिस यांसारख्या गोष्टींमध्ये मदत केली आहे.




























































