
भगवान भक्ती गडावर सावरगाव येथे होणाऱ्या दसरा मेळाव्याला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. या मेळाव्यासाठी जय्यत तयारी सुरू असून त्यांना या कार्यक्रमाचे निमंत्रण पंकजा मुंडे यांनी शहा यांना दिलेले आहे. या कार्यक्रमाला राज्यभरातून साधू संत उपस्थित राहणार आहेत. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर होणाऱ्या या मेळाव्याला मोठे महत्त्व प्राप्त होणार आहे
संत भगवान बाबाची जन्मभूमी असलेल्या भगवान भक्ती गडावर दसरा मेळाव्याला यंदा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अनेक दिग्गज नेते या कार्यक्रमाला उपस्थित असणार आहेत. यानिमित्ताने पंकजा मुंडे शक्तिप्रदर्शन करणार असल्याने हा मेळावा विरोधकांना चांगलीच धडकी भरवणारा असेल असे बोलले जात आहे. भगवान भक्ती गडावर 2017 साली पहिल्यांदा दसरा मेळावा घेत मुंडे यांनी भव्य शक्तिप्रदर्शन केले होते.या वर्षी होणाऱ्या कार्यक्रमाला लाखो भाविकांची उपस्थिती या ठिकाणी असणार असल्याने मोठी व्यवस्था भगवान भक्ती गडावर करणात येत आहे.



























































