तुकडे तुकडे गँगला धडा शिकवलाच पाहिजे- अमित शहा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
amit-shah

नागरिकत्व कायद्याला दिल्लीत मोठे आंदोलन झाले. आंदोलनावेळी हिंसाचारही झाला. यावरून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी विरोधकांना लक्ष्य केले आहे. दिल्लीच्या तुकडे तुकडे गँगला धडा शिकवलाच पाहिजे असे अमित शहा म्हणाले. दिल्लीत एका कार्यक्रमात ते बोलत होते. शहा यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविं केजरीवाल यांच्यावरही टीका केली.

केजरीवाल यांना मुख्यमंत्री होऊन पाच वर्षे झाली तरी त्यांनी दिलेले वचन का पूर्ण नाही केले असा सवाल शहा यांनी विचारला. तसेच “पुढेही हे वचन पूर्ण होणार नाहीत. यांनी फक्त जाहिराती करून लोकांना फसवले आहे. त्यांनी आयुष्यभर लोकांचा विरोध आणि धरणे आंदोलन केले आहे असे” शहा म्हणाले. केजरीवाल यांनी पंतप्रधान आवाज योजना गरीबांपर्यंत पोहोचू दिली नाही कारण ती केंद्र सरकारची योजना आहे असेही शहा म्हणाले.