
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांना आज एम्स रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. शाह यांना स्वाईन फ्लू झाल्याने त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. भाजप नेते व पक्षाचे आयटी प्रमुख अमित मालवीय यांनी याबाबत माहिती दिली.
Anil Baluni, BJP: BJP President Amit Shah has been discharged from AIIMS Delhi where he was admitted for his treatment of swine flu. pic.twitter.com/KWq7I7FlsA
— ANI (@ANI) January 20, 2019
‘अमित शाह यांना आज सकाळी साडे दहाच्या सुमारास एम्समधून डिस्चार्ज देण्यात आले. त्यांची प्रकृती आता स्थिर असून ते घरी परतले आहेत’, असे मालवीय यांनी सांगितले. छातीत दुखू लागल्याने व श्वसनाचा त्रास जाणवल्याने शाह यांना बुधवारी एम्समध्ये दाखल करण्यात आले होते.




























































