
सामना ऑनलाईन । चंदिगड
लोकसभा निवडणुकीला एकच वर्ष उरले असल्यामुळे मित्रपक्षांची प्रकर्षाने आठवण झालेल्या भाजपने ‘संपर्क फॉर समर्थन’च्या नावाखाली मित्रपक्षांचे उंबरठे झिजवण्याचा एककलमी कार्यक्रम हाती घेतला आहे. त्यानुसार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची बुधवारी मुंबईत भेट घेतल्याच्या पाठोपाठ भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी आज शिरोमणी अकाली दलाचे नेते सुखबीरसिंह बादल आणि यांचे वडील प्रकाशसिंह बादल यांचीही भेट घेतली. पंजाबातील ‘शिरोमणी अकाली दल’ हा पक्ष ‘एनडीए’मधील घटक म्हणून भाजपचा मित्रपक्ष आहे.


























































